बाजार विभाग

अनुज्ञप्ती विभाग

बाजार समितीच्या बाजार आवारातील वेगवेगळे बाजार घटक जसे अडते, व्यापारी, मापारी, हमाल, मदतनिस इ. घटकांना नविन अनुज्ञप्ती देणे व नुतनिकरण करणे बाबतची कामे सदर विभागाकडून पाहिली जातात. सहाय्यक सचिव हे या विभागाचे प्रमुख असून सहा. सचिव व एक कर्मचारी यांच्या मार्फत सदर विभागाचे कामकाज पाहिले जाते.

आस्थापना व प्रशासन विभाग

बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी यांचे आस्थापना विषयक बाबी तसेच बाजार समितीच्या सभा, वाहन व्यवस्था, इत्यादी कामे या विभागाकडून पार पाडले जातात. सहाय्यक सचिव हे या विभागाचे प्रमुख असून सहा. सचिव व एक कर्मचारी यांच्या मार्फत सदर विभागाचे कामकाज पाहिले जाते.

लेखा विभाग

बाजार समितीतील आर्थिक बाबीविषयीचे सर्व कामकाज लेखाशाखेमार्फत पार पाडले जातात. यामध्ये वेतन, सर्व देयके प्रदान करणे बाजार समितीची आर्थिक पत्रके तयार करणे अंदाज पत्रके तयार करणे इत्यादींचा समावेश होतो. लेखापाल हे या विभागाचे प्रमुख असून त्यांच्याच मार्फतीने या विभागाचे कामकाज पाहिले जाते.

वसुली व नियंत्रन विभाग

बाजार समितीच्या चालु व थकीत रक्कमांची वसुली, बाजार फी वसुली तसेच शेतमाल खरेदी विक्री व्यवहाराचे नियंत्रन आणि दैनंदिन बाजार भाव प्रसारीत करणे हि कामे या विभागाकडून पाहिली जातात. समितीचे निरीक्षक हे या विभागाचे प्रमुख आहेत. निरीक्षक व दोन कर्मचारी यांच्या मार्फत सदर विभागाचे कामकाज पाहिले जाते.